श्री नरेंद्र मोदी जी,
भारताचे माननीय पंतप्रधान,
नवी दिल्ली.

विषय: हिंदूंच्या दीर्घकालीन वास्तविक तक्रारींचे निराकरणाकरीता सरकारकडे तत्काळ विचार करण्यास हिंदू मागण्यांचे घोषणापत्र

प्रस्तावना

  1. काही महिन्यांपासून, आम्ही हिंदू, आपल्या हिंदू लोकांना, हिंदू समाजाला आणि हिंदूं धर्माला प्रतिकूलरित्या प्रभावित करीत असलेल्या विविध संवैधानिक, वैधानिक आणि सार्वजनिक धोरणाच्या मुद्द्यांवर भारत (जोडपत्र – १)  बद्दल विचार मंथन करीत आहोत. ह्या विचारांची , सप्टेंबर २२,२०१८ रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या एका बैठकीत परिणीती झाली आणि हिंदू मागण्यांचे एक घोषणापत्र तयार करण्यात आले.
  2. अनुभवावर आधारित आणि पडताळणीयोग्य माहितीप्रमाणे असा विश्वास वाढत चालला आहे की हिंदू धर्म आणि अन्य स्थानिक धार्मिक आणि अध्यात्मिक परंपरांच्या पालन करणाऱ्या देशातील बहुसंख्य लोकसंख्येला, भारत राज्य असंतुष्टीत करत आहे. केवळ संविधानाचे अनुच्छेद २५ – ३० आणि इतर काही कलमच निवडकपणे वाचले, विवेचित आणि लागू केले जात नसून, संविधानातील संशोधन सकट अनेक कायदे हिंदू धर्माच्या हानीसाठी सरकार आणि न्यायव्यवस्थेद्वारे अंमलात आणले गेले आहेत

संविधानात आणलेले बहुसंख्यक विरोधी तत्व, कायदे आणि सार्वजनिक धोरण इतके शिगेला पोहोचले आहे की;

(i) केवळ हिंदूंनाच त्यांच्या शैक्षणिक संस्थांचे प्रशासन, राज्य सरकाराच्या हस्तक्षेप शिवाय करण्याचा अधिकार नाही,

(ii) केवळ हिंदूंनाच त्यांच्या स्वतःच्या उपासना स्थानांचे व्यवस्थापन करण्याचे अधिकार नाही,

(iii) केवळ हिंदूंनाच अश्या शिष्यवृत्ती आणि इतर लाभ नाकारले जात आहे जे अहिंदूंना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत,

(iv) केवळ हिंदू धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आणि सण यावरच भारतीय सरकार आणि न्यायालयांद्वारे, लक्ष्य ठेवून आणि प्रतिकूल असे हस्तक्षेप केले जात आहेत.

  1. हिंदु धर्म आणि हिंदू यांच्यावर  केला गेलेला हा निवडक, लक्ष्यकेंद्रीत आक्षेपार्ह दृष्टीकोण सरळ सरळ कायद्यापुढे समानतेच्या तत्त्वाविरुद्ध आणि धार्मिक संबंधांच्या बाबतीत “समान वैधानिक संरक्षण” च्या तत्वाविरुद्ध आहे, जे कि लोकशाही आणि आधुनिक धर्मनिरपेक्ष राज्य स्थापनेचि आधारशीला आहे आणि जे कि संविधान सभेला संकल्पित होते आणि आपल्या संविधानात पण समाविष्ट आहे.
  2. राष्ट्रीय ऐक्य आणि अखंडतेला धोक्यात आणणाऱ्या ह्या विभाजक मतदार आणि सांप्रदायिक राजकारणा व्यतिरिक्त, आपल्या स्वतःच्या देशात एक हिंदू म्हणून वर्गीकृत झाल्या मुळे होणाऱ्या संवैधानिक, वैधानिक, आणि अन्य धोरणाच्या अक्षमते मुळे, आता हिंदु समाजाच्या विविध गटांमध्ये अहिंदू किंवा अल्पसंख्यक म्हणून घोषित होण्या ची भावना वाढत चालली आहे. पूर्वीचे रामकृष्ण मिशन प्रकरण आणि नुकतेच झालेले लिंगायत प्रकरण हे ह्या वृत्ती चे प्रतिनिधी उदाहरण आहेत.

ह्या मुळे आता अजिबात आश्चर्य नाही कि भारतीय सरकारच्या हिंदू धर्माला आणि समाजाला खंडित, अस्थिर आणि नष्ट करण्याच्या जोमाला बघून, हिंदू पूर्णपणे असा हतोत्साहित झाला आहे, जे करण्यात शतकानुशतके ची विदेशी राजवटी सुद्धा पूर्णतः यशस्वी होऊ शकले न्हवते.

  1. भारतीय सरकारच्या अशा हिंदूविरोधी दृष्टिकोणा मुळे हिंदूंच्या वास्तविक तक्रारी, स्वतंत्र भारताच्या  प्रत्येक केंद्रीय आणि राज्य सरकार द्वारे सतत अनिवारीत आणि दुर्लक्षित केल्या जात आहेत. परिणामी हिंदू धर्माला, देशाचा तथाकथित बहुसंख्य धर्म असूनही, शतकांपासून दडपशाही विदेशी राजवटीच्या तुलनेत किंवा त्यापेक्षा जास्त दुर्बलतेचा  सामना करावा लागत आहे. ह्या बाहेरून लादलेल्या अक्षमता, हिंदू धर्म अर्थात सनातन धर्माला हिंदूंच्या सध्याच्या आध्यात्मिक आणि तात्पुरत्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतःला पुनरुत्थित आणि पुनर्जीवित करण्यापासून रोखत आहे. हे सर्व निहित हितसंबंधांच्या फायद्याचच आहे आणि सनातन धर्म आणि आपल्या देशाला आणखी नुकसान पोहोचवत आहे .
  2. आपल्या संस्कृती बद्दल केलेले  एक गहन अवलोकन लक्षात घेणे उचित ठरेल: “हिंदू संस्कृती ही हिंदुस्थानची जीवनशैली आहे. म्हणूनच हे स्पष्ट आहे की जर हिंदुस्थान सुरक्षित ठेवायचे असेल तर आपण हिंदू संस्कृतीचे पोषण केले पाहिजे. जर हिंदूस्थानांतच हिंदू संस्कृतीचाच नाश झाला आणि जर हिंदू समाजाचे अस्तित्वच संपुष्टात आले तर ह्या भौगोलिक अस्तित्त्वाचा हिंदुस्थान म्हणून उल्लेख करणे कठीण आहे. भौगोलिक तुकड्या जोडून काही राष्ट्र बनत नाही“
  3. सनातन धर्मात रुतलेल्या आपल्या महान संस्कृतीचे विश्वस्त, संरक्षक आणि योग्य वारसदार म्हणून, भारत राज्याकडे ह्या संस्कृती चे सुरक्षण, संरक्षण, संगोपन आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत हि संस्कृती पोहोचवण्याची जबाबदारी आहे . म्हणूनच, इतिहासातील या महत्त्वपूर्ण कालखंडात, सध्या अस्तित्वात असलेल्या बहुसंख्य विरोधी किंबुहना संस्कृती विरोधी कायद्यांचे आणि सार्वजनिक धोरणांचे चालू राहणे आपल्या सभ्यता, धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख आणि धरोहर साठी विनाशकारीच आहे.
  4. असे बोलणे अतिशयोक्ती नाही ठरणार कि हे नुकसान असच चालू राहिलं तर सर्वात प्राचीन सभ्यतेचा आणि संस्कृतीचा झरा असणारा हिंदू धर्म ज्याचा आपण सर्वांनी अभिमान बाळगला पाहिजे आणि केवळ एकच धर्म आणि संस्कृती अशी, जी  ‘एकं सत् विप्र बहुधा वदंती’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ या उच्चतम तत्त्वांचा फक्त उच्चारणच नाही तर रोजच्या जीवनात वापर पण करत असते – ती संस्कृती, जर लवकरच भारत सरकारनी त्वरित आणि निरंतर सुधारात्मक उपाय सुरू केले नाही तर, लवकरच ह्या भूतलावरून अदृश्य होईल. म्हणून आम्ही असे सुज्ञ कायदे आणि सार्वजनिक धोरणे यांच्या मागावर आहोत जे केवळ आपल्या सभ्यतेचा इतिहास आणि संस्कृती समजून घेण्यासाठी महान दृष्टीच दर्शवत नाहीत तर आपल्या सभ्येतेचा गत गौरव परत आणून आपल्या सांस्कृतिक पुनरुत्थानाचं संगोपन पण करतील.
  5. उपरोक्त विचारात घेता, खालील प्रमाणे हस्ताक्षरांकित व्यक्तीनीं, सखोल विचारविनिमय नंतर, एकमताने विनंती करण्याचे ठरवले, कि खाली संक्षिप्त प्रमाणात  नमूद केल्या प्रमाणे आमच्या काही यथार्थ मागण्यांवर त्वरित कारवाई करावी, जेणेकरून हिंदूंमध्ये निष्पक्ष आणि न्यायसंगत असे संवैधानिक, वैधानिक आणि सार्वजनिक धोरणावरील उपचार या बद्दल  विश्वास निर्माण होईल आणि २०१९ मधील निवडणुकी येई पर्यंत वाटेल कि त्यांचे प्रश्न पण महत्त्वाचे आहेत.
  6. या घोषणापत्राला, हे तयार आणि सादर करण्यासाठी पुढाकार घेण्याऱ्या निवडक व्यक्तींव्यतिरिक्त इतर सर्व हिंदूंचा पण पाठिंबा आहे.