हिंदूंची उपासना करण्याच्या हजारो ठिकाणी अपवित्र किंवा नाश करण्यात आले आणि बरेच अती जीर्णावस्थेत आणि विस्थापित स्थितीत आहेत. आणि आज स्वातंत्र्यानंतर ७० वर्षां नंतर ही, यापैकी बरेच गैर वापर आणि नादुरुस्त अवस्थेत आहेत. म्हणूनच आता अत्यावश्यक झाले आहे की केंद्रीय आणि राज्य स्तरांच्या पुरातत्व विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या आणि इतर सर्व हिंदू मंदिर आणि पवित्र स्थाने, जे सध्या जिर्ण, अपवित्र आणि विध्वंस अवस्थेत आहेत, त्यांचे पुनर्निर्माण, जिर्णोद्धार आणि त्यांच्या मूळ स्थितीमध्ये पुनर्रचना झाली पाहिजे आणि तिथे परत पूजा अर्चना सुरु झाल्या पाहिजेत.

शिवाय, वेद पाठशाळा, पारंपरिक कला रूप, साहित्य, नृत्य, संगीत, चित्रकला, शिल्पकला, वास्तुकला इ. जे कि हिंदू धर्म आणि संस्कृतीची प्रचार आणि प्रसार याची वाहने आहेत आणि आपले सांस्कृतिक धरोहर आहेत ते सर्व उचित आश्रय आणि उपजीविकेची साधन नसल्या मुळे मृतावस्थेला येऊन ठेपली आहेत. हिंदू धर्म हा आपल्या सभ्यतेचा पाया आहे हे सांगणं आवश्यक नाही. आणि जर ह्या हिंदू धर्माचे उचित संगोपन केले नाही तर ही एकेकाळची महान आणि अति प्राचीन संस्कृती लवकरच मृतावस्थेत पोचेल, ज्यासाठी केवळ “स्वतंत्र भारताचे” हिंदूच जबाबदार असतील

म्हणूनच भाजपच्या अखंड वचनबद्धते ला अनुसरून, २०१४ निवडणुकीच्या घोषणापत्राच्या प्रस्तावनेत आणि ‘सांस्कृतिक वारसा’ ह्या शीर्षांतर्गत, भारताची संरचना एका सशक्त आधारशीलेवर करण्यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करतो कि एक “हिँदवी संस्कृती जीर्णोद्धार निगम” नावाचा, प्रारंभिक बीज साठी १०,०००/- कोटी रु भांडवल पेक्षा कमी नसलेला आणि समान प्रमाणात वार्षिक अनुदान असलेला केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रम स्थापन करावा. ह्या निगमच्या कार्यक्रमात सर्व जीर्ण-शीर्ण, दूषित, परित्यक्त हिंदू मंदिर आणि पवित्र ठिकाणे यांचा जीर्णोद्धार, पुनर्जीवन आणि पुनर्निर्माण, वेद पाठशाळा, विविध पारंपारिक कला प्रकार, नृत्य, संगीत, शिल्पकला, वास्तुकला, चित्रकला इत्यादी चे पुनरुत्थान, संगोपन, आश्रय आणि प्रोत्साहन असेल. यामुळे पारंपारिक क्षेत्रात व्यवसाय आणि रोजगाराची संधी पण निर्माण होईल.